एनडी तिवारी यांची प्रकृती खालावली, आयसीयूत उपचार सुरू

0
13

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एन डी तिवारी यांची प्रकृती खालावली असून त्यांना आयसीयूत हलविण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना आयसीयूत हलविण्यात आले.

९२ वर्षीय तिवारी यांना गेल्या वर्षी पक्षाघाताचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांनी देखील तिवारी यांच्या तब्येतीविषयी ट्विट केले आहे.