एका कुटुंबासाठी अन्य नेत्यांचे योगदान नाकारले गेले- पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
11

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक नेत्यांनी आपले आयुष्य वेचले, पण केवळ एकाच कुटुंबाला स्वातंत्र्यलढय़ाचे श्रेय देताना सरदार वल्लभभाई पटेल, ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान नाकारण्याचा कोतेपणा देशावर सत्ता गाजवणाऱया सत्ताधीशांनी दाखवला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाव न घेता नेहरू-गांधी घराण्यांवर टीकेची तोफ डागली. आझाद हिंद सेनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.