आळंदीमध्ये एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार

0
3

आळंदीमध्ये एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. भंगार व्यवसायिकाबरोबरच्या भांडणापोटी दोघांनी त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. याप्रकरणी सद्दाम अब्दुलबारी हुसेन, सलमान उर्फ नसीब मुबारक अली या दोघांना आणि त्यांना मदत करणाऱ्या सचिन गावडे आणि आकाश जरकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बलात्काराच्या घटनांमुळे पिंपरी चिंचवड काही दिवसांपूर्वी हादरले असताना आता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही घटना घडल्यानं पोलिसांपुढे कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.