आलोक वर्मा यांच्या विरोधात चौकशी दोन आठवडयात पूर्ण करा – सर्वोच्च न्यायालय

6

सीबीआयमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत गृहयुद्धात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या विरोधातील चौकशी दोन आठवडयात पूर्ण करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए.के.पटनायक यांच्या देखरेखीखाली ही चौकशी होईल. सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांना धोरणात्मक निर्णय घेण्यापासून सर्वोच्च न्यायालयाने रोखले आहे. त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे.

नागेश्वर फक्त प्रशासकीय प्रमुख असतील असे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी सांगितले. राव यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी जे जे निर्णय घेतले आहेत ते सर्व कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालय दिवाळीनंतर १२ नोव्हेंबरला या प्रकरणी सुनावणी घेईल असे कोर्टाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु असतानाच काँग्रेसचा लोधी रोडवरील दयाल सिंह कॉलेजपासून सीबीआय मुख्यालयापर्यंत मार्च निघाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीआय मुख्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आलोक वर्मा यांच्या वतीन फाली.एस.नरीमन युक्तीवाद करणार आहेत. सीव्हीसीकडून तृषार मेहता बाजू मांडणार आहेत. केंद्र सरकारकडून अॅटॉर्नी जनरल के.के.वेणूगोपाल युक्तीवाद करतील. राफेल घोटाळयाची चौकशी रोखण्यासाठी पंतप्रधानांनी सीबीआय प्रमुखांना हटवले असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

728×120-jaymobile-012018-1

Comments are closed.

https://wp.me/p8vtBO-fuo