आलोकनाथ आणि साजिद खान यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

0
10

ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ आणि दिग्दर्शक- अभिनेते साजिद खान #MeToo च्या फेऱ्यात आल्यानंतर आता याचा परिणामही दिसू लागलायं. द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉइज (एफडब्ल्यूआयसीय) दोघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी करणार आहे. त्यामुळे या दोघांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाल्याचे दिसून येतं. दोघांवरही लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आलाय.

लैंगिक छळाच्या आरोपांवर अलोकनाथ यांनी दिलेलं उत्तर टेलीविजन निर्देशक मंडळाला (आयएफटीडीए) पटलेलं नाही. तर दुसरीकडे साजिद खानने ‘आयएफटीडीए’ च्या प्रश्नाला उत्तरचं दिल नाही.

सिनेसृष्टीतील काही महिलांनी या दोघांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर त्यादृष्टीने गंभीर पाऊले उचलण्यात आली आहेत. लैंगिक अत्याचाराविरोधात आयएफटीडीए आणि एफडब्ल्यूआयसीई चे सदस्या आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

‘विशाखा’चे पालन
‘विशाखा’ अंतर्गत नियमांचे पालन प्रत्येक प्रोडक्शन हाऊसने करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच विशेष तक्रार निवारण समिती अनिवार्य करण्यात आल्या आहेत. यामुळे लैंगिक अत्याचारांच्या घटनांवर लक्ष ठेवता येणार आहे.

कायदेशीर मार्गदर्शन
अन्याय, अत्याचार होणाऱ्यांना खुलेपणाने बो. लण्यासाठी ही समिती कार्य करणार आहे. यामुळे सिने क्षेत्रातील लैंगिक अत्याचारांची प्रकरणं कमी होती असा विश्वास समितीला आहे. अन्यायाचे प्रकरण पुढे नेण्यास पिडितांना मदत करण्यात येणार आहे. यासोबतच त्यांना कायदेशीर मार्गदर्शन आणि सहाय्यही करण्यात येणार आहे.