आरोग्य – खोकल्यासाठी काही घरगुती उपाय …

0
15

खोकल्यासाठी काही घरगुती उपाय …

१. घशात चिकटपणा असेल आणि कफ सुटत नसेल तर सुंठीचा तुकडा तोंडात धरून चघळावा . सुंठ जाळून तिची मशेरी करावी ही मशेरी बारीक वस्त्रगाळ करून मध मिसळून घ्यावी …

२. कफ जास्त पडत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी सुंठीच्या काढ्यात तयार केलेले एरंड तेल एक ते दोन चमचे घ्यावे .

३. कफ पडत नसेल तर वेलची आणि खडीसाखर चावून खावी .

४. कात आणि दालचिनी यांची गोळी करून तोंडात धरली कि घसा मोकळा होतो .

५. जायफळ उगाळून ते चाटून आणि वर थोडे कोमट पाणी घेतल्यास सर्दी – खोकला एकत्र असेल तर फायदा होतो .

६. तुळशीचा रस आणि मध समप्रमाणात मिसळून घ्यावा . किंवा तुळशीचा काढा खडीसाखरेसोबत घ्यावा .

७. बेलाच्या पानांचा रस एक चमचा दिवसातून तीनदा घ्यावा .

८ . जेष्ठ मधाच्या कांड्या चघळल्या तर कफ सुट्टा व्हायला मदत होते .

९. एक मिरी घेऊन तीचे चूर्ण मधातून दिवसातून चारदा चाटावे . प्रत्येक वेळी नवीन मिरी घ्यावी . खोकला वेगाने कमी होतो .

१०. खोकल्यात कफ कमी करण्यासाठी बडीशेप भाजून खावी .

११. निखाऱ्यावर ओवा टाकून त्याचा धूर तोंडाने ओढून तोंडानेच सोडावा . त्याने खोकल्याने होणारी घुसमट थांबते .

१२. लसूण टाकून उकळलेले दुध दिल्यास खोकला कमी होतो .

१३. सागरगोट्याच्या कोवळ्या पानांचा रस घ्यावा .

१४. लवंग , दालचिनी आणि खडीसाखर समप्रमाणात चूर्ण रुपात घेऊन मधासोबत चाटावी.

१५. अडुळसा ची वाळलेली पाने घेऊन त्यांची विडी तयार करून ओढावी .

१६. हळद , सुंठ घालून उकळलेले दुध प्यावे .

१७. हिंग आणि कापूर यांची बोराच्या बी एवढी गोळी करून चघळावी .