‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइमटाइम द्या, अन्यथा खळ्ळ खटॅक: मनसेचा इशारा

5

‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला मराठी सिनेरसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे कल्याणमधील सिनेमॅक्स मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचा दिवसभरात फक्त एक शोच आहे. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांच्या होणाऱ्या गळचेपी विरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली असून ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला प्राइमटाइममधील शो द्यावा, अन्यथा खळ्ळ खटॅक करण्याचा इशारा मनसेचे कल्याण येथील शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई यांनी दिला आहे.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सलग सुट्ट्यांमुळे ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी होत आहे. मात्र, कल्याणमधील सिनेमॅक्स येथे गेलेल्या प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. कल्याणमधील सिनेमॅक्समध्ये या चित्रपटाचा दिवसभरात फक्त एकच शो आहे. तो देखील दुपारी तीनचा. मराठीऐवजी सिनेमॅक्सने ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे शो जास्त ठेवले आहेत.

ही बाब मनसेचे कल्याणमधील शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई यांनी समजली असता त्यांनी कल्याणमधील सिनेमॅक्स व्यवस्थापनाला इशाराच दिला आहे. प्राइमटाइममध्ये ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या शोला स्थान द्यावे, अन्यथा खळ्ळ खटॅक केले जाईल, अशा इशाराच त्यांनी व्यवस्थापनाला दिला आहे. आता सिनेमॅक्स ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’या चित्रपटाचे शो वाढवणार का, याकडे मराठी सिनेरसिकांचे लक्ष लागले आहे.

728×120-jaymobile-012018-1

Comments are closed.

https://wp.me/p8vtBO-fCc