आजची रेसिपी; नीर डोसा

0
9

साहित्य-

एक वाटी तांदूळ, एक वाटी ओलं खोबरं, मीठ, तेल

कृती-

आदल्या दिवशी तांदूळ भिजवत ठेवायचे. दुसऱया दिवशी ते खोबरं घालून अगदी वस्त्रगाळ होईपर्यंत मिक्सरमधून काढायचे. एक वाटी तांदूळ असेल तर एक वाटी ओलं खोबरं असं प्रमाण घ्यायचं. वाटताना जास्तीचं पाणी न घालता आवश्यक तेवढंच थोडं थोडं पाणी घालायचं. त्यामुळे ते पीठ बारीक व्हायला मदत होते. तव्यावर ते डोसे करताना गरजेप्रमाणे पाणी घालू शकतो. तवा गरम होऊ द्यायचा, मग त्यावर पातळ डोसा घालायचा. थोडा वेळ झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. म्हणजे डोसा सहज निघेल.