अवनीच्या मृत्यू संदर्भात सरकारकडून नेमली चौकशी समिती

0
7

केंद्र आणि राज्य सरकारकडून अवनीच्या मृत्यू संदर्भात चौकशी करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या नेमण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची एक समिती तर राज्याच्या वन विभागाकडून चौकशीसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे अवनीबद्दल नेमकं काय झालं याचा खुलासा आता होणार अशी आशा वाघ्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.

वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य श्री बिलाल, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष श्री अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

तर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची एक समिती सदस्य नेमण्यात आली आहे. त्यात ओ पी कालेर, जाईस लुईस आणि हेमंत कामडी काम पाहणार आहेत.