अमेरिकेत प्रार्थनास्थळाबाहेर गोळीबार; 11 ठार, 6 जण जखमी

0
3

अमेरिकेच्या पिट्सबर्गमध्ये ज्यू प्रार्थनास्थळाबाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 11 जण ठार तर सहा जण जखमी झालेत. पोलिसांनी हा गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. प्रार्थनास्थळाबाहेर झालेल्या या हल्लानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील या गोळीबाराचा निषेध केला आहे. दरम्यान, अमेरिकेमध्ये याआधीही अनेकदा प्रार्थनास्थळांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे निरपराधांचे बळी घेणारे असे हल्ले थांबणार तरी कधी, असा सवाल आता अमेरिकन नागरिक विचारत आहेत.